गुढीपाडवा म्हणजे चैत्रपालवीचा सण, ऋतुचक्राच्या नव्या आवर्तनाचं,नव्या - नवाळीच स्वागत करणारा सण. कडुलिंबासारख्या कडवट आठवणींनी भरलेल मागचं वर्ष मागे सारून पैठणीच्या तोऱ्यात , इरकलीच्या डौलात आणि खणाच्या साजात सण साजरा करुयात.
ह्या लॉकडाऊन परिस्थिती आपल्यांसोबत हा सण साजरा करता येणार नाही आणि म्हणुनच पारंपारिक सणाला आपलेपणाचा स्पर्श देण्यासाठी मृणाल देसाईंनी 'चैत्रांगण' हा Box तयार केला आहे . ह्या Box मधे महावस्राचा मान असलेल्या पैठणीच देव-आसन ,समृद्ध परंपरा लाभलेल्या खणाचं तोरण आणि टोपी, कित्येक वर्षे मायेचा ओलावा पिढ्यानपिढ्या पुरवणाऱ्या इरकलच गुढीचं वस्त्र आणि उपरण आहे.
माणसांमधल अंतर जास्त ठेवावं लागत असलं तरी सणांचा आनंद आणि उत्साह कायम राखत सुरक्षित सण साजरा करुयात.
1. Khunn Toran ( length - 37")
2. Gudi (Fabric Ilkal hight -20")
3. Devache puja asan (paithani fabric (12*20")
4. Uparan (cotton silk with ilkal border 1 meter * 2 meters)
5. Gandhi Topi (khunn fabric hight 3" length 12")